राज्यात थंडी पुन्हा वाढणार; पुण्यात थंडी कमी  | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

winter

पुणे शहरात गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. नाताळापर्यंत (ता. 25) शहरात सरासरीपेक्षा कमी तापमान होते. त्यानंतर मात्र, थंडीचा कडाका कमी होत आहे.

राज्यात थंडी पुन्हा वाढणार; पुण्यात थंडी कमी 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - उत्तर भारतातील काही राज्यांत थंडीची लाट आल्याने किमान तापमानाचा पारा खाली उतरला आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होणार असून येत्या दिवसांत थंडी पुन्हा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

जम्मू-काश्‍मीर, लडाख, हिमाचल प्रदेशात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीची लाट पसरली आहे. तेथील तापमान 3 ते 5 अंश सेल्सिअसने घसरले आहे. तेथून राज्याच्या दिशेने वाहणाऱ्या थंड आणि कोरड्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील काही भागात थंडी वाढणार आहे. 

देशात पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक ऍक्‍टिव्ह रुग्ण; बरे होण्याचेही प्रमाणही...

हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात गेल्या तीन ते चार दिवसांपासून समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. तसेच हिंदी महासागर आणि अंदमान समुद्राच्या दक्षिण भाग व बंगालचा उपसागर व परिसरात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आहे. यामुळे उत्तरेकडील थंड वाऱ्यांना अडथळा तयार होत असल्याने राज्यातील काही भागांत हवामान किंचित ढगाळ आहे. यामुळे थंडी कमी-जास्त होत आहे. 

प्रमुख शहरातील तापमान 
(अंश सेल्सिअसमध्ये) : मुंबई 21.6, रत्नागिरी 20.2, डहाणू19.9, पुणे 13.6, जळगाव 13.2, कोल्हापूर 17.6, मालेगाव 15.4, नाशिक 14.4, सांगली 15.4, सातारा 14.7, सोलापूर 13, औरंगाबाद 13.7, परभणी 13, नांदेड 9, उस्मानाबाद 12, अकोला 13.8, अमरावती 13.4, बुलडाणा 15, गोंदिया 9, नागपूर 11.2, वर्धा 11.5 (रविवारी सकाळी साडेआठपर्यंतची आकडेवारी) 

जाहिरातींचे होर्डिंग पुणेकरांच्या जिवावर;अपघातांची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्‍चित करा
 
पुण्यात थंडी कमी 
शहरात गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा सातत्याने वाढत आहे. नाताळापर्यंत (ता. 25) शहरात सरासरीपेक्षा कमी तापमान होते. त्यानंतर मात्र, थंडीचा कडाका कमी होत आहे. रविवारी सरासरीपेक्षा तीन अंश सेल्सिअसने किमान तापमानाचा पारा वाढला. तो 13.6 अंश सेल्सिअस नोंदला गेल्याची माहिती हवामान खात्याने दिली. पुढील तीन ते चार दिवसांमध्ये हवामान कोरडे राहणार असून, किमान तापमानाचा 13 ते 14 अंश सेल्सिअसपर्यंत राहण्याचा अंदाज आहे. 

loading image
go to top