चौधरी यात्रा कंपनीच्या भाविकांना चीनमध्ये घेतले ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 ऑगस्ट 2019

नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनीने त्यांच्या नेपाळ आणि चीनसाठी काम करणाऱ्या त्यांच्या सहयोगी कंपनीला पैसे दिले नाही म्हणून कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या 29 यात्रिकांना संबंधित कंपन्यांनी चीनमध्ये ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील पासपोर्ट देखील जमा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
 

पुणे ः नाशिक येथील चौधरी यात्रा कंपनीने त्यांच्या नेपाळ आणि चीनसाठी काम करणाऱ्या त्यांच्या सहयोगी कंपनीला पैसे दिले नाही म्हणून कैलास-मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या 29 यात्रिकांना संबंधित कंपन्यांनी चीनमध्ये ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडील पासपोर्ट देखील जमा करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या बाबत सविस्तर माहिती अशी की, चौधरी यात्रा कंपनीच्या नाशिक शाखेतून 29 जणांनी कैलास-मानसरोवर यात्रेचे पॅकेज घेतले होते. त्यानुसार त्यांचा मानसरोवरपर्यंत प्रवास झाला. त्यानंतर यात्रेकरूंचा परतीचा प्रवास सुरू झाला असता. मात्र चौधरी यात्रा कंपनीतर्फे नेपाळ आणि चीनसाठी काम करणाऱ्या त्यांच्या सहयोगी कंपनीने त्यांना नेपाळ सीमेपासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या चीनमधील टाकलाटोक येथे ताब्यात घेतले.

चौधरी यात्रा कंपनीने आमचे पैसे दिले नसल्याचे कारण देत यात्रेककरूंना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यानंतर त्यांचे पासपोर्ट देखील जप्त करण्यात आल्याची माहिती येथील वकील लक्ष्मण खिलारी यांनी दिली.

लखनौ येथे आमची यात्रा संपणार होती. मात्र आता आमची याठिकाणाहून कधी सुटका होईल हे माहिती नाही. चौधरी यात्रा कंपनीने आमची फसवणूक केली आहे. आमची सुटका होण्यासाठी मदत मिळावी, यासाठी प्रयत्न करीत असल्याचे ऍड. खिलारी यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chowdhary Travel Companies passengers detained in China