Churchgate Hostel Murder Case : "...त्या तरुणींच्या आई-वडिलांची काय घुसमट होत असेल" अमित ठाकरेंचा संताप!

Churchgate Hostel Murder Case
Churchgate Hostel Murder Case

मुंबईतील चर्चगेट परिसरात काल (मंगळवार) १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. बलात्कारानंतर हत्या झाल्याचा पोलिसांना संशय आहे. मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या खोलीत मुलीचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला असून खोलीला बाहेरून कुलूप आहे. वसतिगृहात काम करणारी एक व्यक्तीही घटनेनंतर बेपत्ता होती. त्या व्यक्तीला मृतदेह पोलिसांना सापडला आहे.

मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार, चर्चगेट येथील मुलींच्या वसतिगृहातून १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला आहे. त्यांच्या खोलीला बाहेरून कुलूप असून खोलीच्या आत दुपट्ट्याला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.

शासकीय वस्तिगृहात हा प्रकार घडल्यामुळे विरोधक सरकारवर टीका करत आहे. राज ठाकरे यांचे पुत्र मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच त्यांनी महिलांच्या वस्तिगृहाचे सिक्युरिटी ऑडिट करण्याची मागणी केली आहे.

Churchgate Hostel Murder Case
Churchgate Hostel Murder Case : सरकार अलर्ट मोडवर! शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतला मोठा निर्णय!

अमित ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या अखत्यारीतील सावित्रीमाई फुले महिला छात्रालयात एका विद्यार्थिनीला आपला जीव गमवावा लागणं ही एक अत्यंत संतापजनक घटना आहे. ज्या सावित्रीमाईमुळे भारतातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ झाली, त्यांच्याच नावाच्या हॉस्टेलमध्ये एका १९ वर्षीय विद्यार्थिनीचा बलात्कार-खून झाल्यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकली आहे."

"आज हजारो तरुणी आपल्या शहर-गावापासून दूर मुंबई-पुण्यासारख्या शहरात शिक्षण-नोकरीसाठी हॉस्टेलमध्ये राहत आहेत. कालच्या दुर्दैवी घटनेमुळे अशा तरुणींच्या आईवडिलांची काय घुसमट होत असेल, याची कल्पना करवत नाही. राज्य सरकार आणि संबंधित विभागांनी आता तरी महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न अतिगांभीर्याने घ्यावा आणि राज्यातील सर्व महिला हॉस्टेल्सचे 'सिक्युरिटी ऑडिट' करावे,” अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे.

Churchgate Hostel Murder Case
Mumbai Murder Case: वसतिगृहे 'असुरक्षित' च नव्हे; तर ती जीवघेणी, महिला नेत्यांचा संताप

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com