esakal | Vidhan Sabha 2019 : शिवसेनेवरून राणे भावांमध्ये वाद
sakal

बोलून बातमी शोधा

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेवरून राणे भावांमध्ये वाद

- शिवसेनेवरून नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये ट्विटवर वाद. 

Vidhan Sabha 2019 : शिवसेनेवरून राणे भावांमध्ये वाद

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

पुणे : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यामध्ये ट्विटवर वाद झाल्याचे पाहिला मिळत आहे. नितेश राणे यांनी शिवसेनेच्या बाजूने ट्विट केले. त्यावर त्यांचे बंधू निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली. 

नितेश राणे यांनी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपकडून उमेदवारही देण्यात आली. त्यानंतर आता नितेश राणे यांनी ट्विटरवरून शिवसेनेचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे, असे सांगितले.

त्यावर त्यांचे बंधू निलेश राणे ट्विट केले. यामध्ये त्यांनी सांगितले, की नितेशच्या ह्या विषयाशी मी जराही सहमत नाही. ज्या पक्षानी राणे साहेबांना त्रास दिला, माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी सेनेशी दोन हात केले, केसेस घेतल्या, संघर्ष केला त्यांना हे कधीच सहन होणार नाही. राजकारण आपल्या ठिकाणी पण वार मी समोरूनच करणार.

मोदीजी, फडणवीसजी बेरोजगारीवर बोला; राहुल गांधींची टीका