Vidhan Sabha 2019 : मोदीजी, फडणवीसजी जरा बेरोजगारीवर बोला; राहुल गांधींची बोचरी टीका

टीम ई-सकाळ
रविवार, 13 ऑक्टोबर 2019

मुंबई : देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचं संकट आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईतील जाहीर सभेत भाजप सरकारवर टीका केली. कांदीवली येथे त्यांची जाहीर सभा झाली.​

मुंबई : देशात मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचं संकट आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावर एक शब्दही बोलायला तयार नाहीत, अशा शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईतील जाहीर सभेत भाजप सरकारवर टीका केली. कांदीवली येथे त्यांची जाहीर सभा झाली.

गो बॅक मोदी ट्विटरवर सुरू आहे ट्रेंड 

40 वर्षांतली सर्वांत मोठी बेरोजगारी
राहुल गांधी म्हणाले, 'देशात उद्योग व्यवसायांची अवस्था अतिशय वाईट आहे. गुजरातमध्ये हिरे उद्योगावर परिणाम झाला आहे. अनेक कारखाने बंद पडत असल्याने कामगार वर्ग रस्त्यावर येत आहे. देशात आजवरची 40 वर्षांतली सर्वांत मोठी बेरोजगारी आहे. तरुण वर्ग रस्त्यावर आला आहे. पण, पंतप्रधान नरेंद्र मोदी चंद्राच्या गोष्टी करत आहेत. देशात इतकी भीषण परिस्थिती आहे याचा अंदाज तुम्हाला येत नाही. येत्या सहा महिन्यांत परिस्थिती आणखीन बिकट होणार आहे. पण, सरकार त्यावर काहीच बोलायला तयार नाही.'

प्रकाश मेहतांच्या मनसे उमेदवाराला शुभेच्छा? व्हिडिओ व्हायरल

चीनच्या अध्यक्षांसोबत चहा
राहुल गांधी म्हणाले, 'पंतप्रधान मोदींनी मोठा गाजावाजा करत मेक इन इंडियाची घोषणा केली होती. पण, त्या मेक इन इंडियाचं झालं काय? नुकतीच त्यांनी चीनच्या अध्यक्षांची भेट घेतली. देशात बेरोजगारीने तोंडवर काढले असताना, कारखाने बंद पडत असताना, पंतप्रधान मोदी चीनच्या अध्यक्षांसोबत चहा पित बसले आहेत. मोदी कधी कॉर्बेटला जातात, चंद्राची चर्चा करतात. सामान्य माणसाचं लक्ष इतरत्र वळवण्याचा हा त्यांचा डाव आहे. देशातील जनता त्रस्त आहे. जीएसटीचा फायदा झालेला एक माणूस मला दाखवा.'

पुन्हा राफेल!
राहुल गांधी यांनी कांदीवलीच्या सभेत पुन्हा राफेलचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, ‘राफेलमध्ये गैरव्यवहार झाला हे संपूर्ण देशाला माहिती आहे. संरक्षण मंत्रालयानं स्पष्ट शब्दांत पंतप्रधान कार्यालय हस्तक्षेप करत असल्याचं म्हटलंय. त्यामुळंच राजनाथसिंह स्वतः फ्रान्सला राफेलची डिलिव्हरी घ्यायला गेले.’

राहुल गांधी म्हणतात...

  1. नोटबंदीनंतर पैसा कोणाच्या घशात गेला?
  2. शेतकरी आत्महत्येवर सरकार का बोलत नाही?
  3. जीएसटीचा फायदा कोणाला झाला आहे का?
  4. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांना सरकार बगल देत आहे का?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidhan Sabha 2019 congress leader rahul gandhi speech unemployment devendra fadnavis narendra modi