
अकोला जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. बाळापुर तालुक्यातील हातरुण गावात एकाच समाजाच्या दोन गटात मोठा राडा झाला आहे. शुल्लक कारणावरून दोन्ही गटात वाद उफाळला आहे. या वादानंतर दोन्ही गट आमने-सामने आले. त्यानंतर मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली आहे. यात काही जण जखमी आहेत.