पदवीधरांच्या नशिबी सफाईकाम!

Swatch-Bharat-Abhiyan
Swatch-Bharat-Abhiyan

मुंबई - कोणतेही काम छोटे किंवा मोठे नसते, असे म्हटले जाते. पण, काही कामांबाबत अनेक जण ‘खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी’ असे म्हणत नाक मुरडतात. पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील चित्र मात्र वेगळेच आहे. येथे गेल्या काही वर्षांत पदवीधर कामगारांची संख्या वाढली आहे. तब्बल ५,७०० पदवीधर तरुण मुंबईत झाडलोट करतात. अनुकंपा तत्त्वावर मिळालेल्या सदनिका वाचविण्यासाठी त्यांची ही धडपड सुरू असल्याचे दिसून आले.

पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन खात्यात अनुकंपा तत्त्वावर कामगारभरती होते. सध्या येथे सुमारे ३५ हजार कामगार आहेत. इतर कोणत्याही खात्यात अनुकंपाची सुविधा नाही. निधन झालेल्या कर्मचाऱ्याच्या वारसाने अनुकंपाचा लाभ घेतला नाही, तर त्या कामगारांच्या नातेवाइकांना पालिकेने दिलेली सेवा सदनिका सोडावी लागते. त्यामुळे घर वाचविण्यासाठी सुमारे ५,७०० पदवीधर तरुणांनी सफाई कामगार म्हणून काम स्वीकारले आहे. त्यांना गुणवत्तेनुसार पदोन्नती द्या, अशी मागणी केली जात आहे. 

मात्र, प्रशासन त्याची दखल घेत नाही. १९७७ मध्ये सुधारित ‘पीटी केस नियम’ लागू करण्यात आला. त्यात शैक्षणिक पात्रतेनुसार सफाई कामगारांना बढती देऊन पालिकेच्या सेवेत सामावून घेण्याची तरतूद नियमात आहे. हा नियम लागू करण्यासाठी सफाई कामगारांकडे विविध सफाई कामगारांच्या संघटनांनी 
सतत मागणी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com