बंद मिनी ट्रेनचा निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका 

बंद मिनी ट्रेनचा निवडणूक कर्मचाऱ्यांना फटका 

माथेरान : शहरात येण्यासाठी टॅक्‍सी स्टॅंडपासून दोन किलोमीटर अंतर आहे. त्यामुळे तेथून शहरात येण्यासाठी मिनी ट्रेन शटल सेवा स्थानक आहे. ऑगस्ट महिन्यात जास्त पावसामुळे सुरक्षेच्या कारणास्तव अनिश्‍चित काळासाठी बंद ठेवण्यात आली. त्यामुळे माथेरानमध्ये येण्यासाठीचा महत्त्वाचा मार्ग बंद असल्यामुळे त्याचा फटका निवडणुकीच्या सामानाला व येथे निवडणुकीच्या कामकाजासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांनाही बसला आहे. कर्मचाऱ्यांनी मतपेट्या चक्क डोक्‍यावर ओझ्याप्रमाणे घेऊन माथेरान गाठले. 

शहरात येण्यासाठी घोडे किंवा पायपीट करून यावे लागते. स्थानिकांसह पर्यटकही याला अपवाद नाहीत. आता तर निवडणुकीसाठी दाखल झालेल्या कर्मचाऱ्यांनाही मिनी ट्रेन बंदचा फटका बसला. माथेरानचे प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीवरून शहरात येण्यासाठी साधारण अर्धा ते पाऊण तास लागतो.

तेथून निवडणुकीचे कामकाज करण्यासाठी मतपेट्या घेऊन आलेल्या कर्मचाऱ्यांना मतपेट्या चक्क हातामध्ये आणि काहींनी डोक्‍यावर ओझेवाल्याप्रमाणे घेऊन आपले केंद्र गाठले असल्याने त्यांनाही गाडीशिवाय मतदान सामान आणावे लागले. या नियमांपासून शासकीय अधिकारी व कर्मचारीही वाचले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये हा विषय चर्चेचा बनला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com