राज्यातून थंडी गायब 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

विदर्भ, मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत थंडी गायब झाली आहे. दरम्यान, विदर्भात येत्या शनिवारपर्यंत (ता. 8) हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

पुणे - ढगाळ वातावरणामुळे राज्यात उन्हाचा चटका कमी झाला. तर रात्रीचे तापमान वाढले असल्याचे निरीक्षण हवामान खात्याने मंगळवारी नोंदविले. राज्यात सर्वाधिक तापमान सोलापूर येथे 33.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात पावसाला पोषक वातावरण असल्याने ढगाळ हवामान होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होत थंडी गायब झाली आहे. दरम्यान, विदर्भात येत्या शनिवारपर्यंत (ता. 8) हलक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

बेरोजगारांसाठी खुशखबर! पुण्यात मिळणार रोजगाराची संधी

पूर्वेकडून बाष्पयुक्त वारे वाहत आहे. तसेच मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र ते दक्षिण कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाला आहे. त्याचा थेट परिणाम राज्यातील किमान तापमानात सरासरीपेक्षा अधिक वाढ होऊन थंडी गायब झाली आहे. यातच अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरावरून होत असलेल्या बाष्प पुरवठ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. 

पुण्यात ढगाळ वातावरण 
शहर आणि परिसरात पुढील दोन दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्‍यता असली तरीही शुक्रवारपासून (ता. 7) आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पुण्यात मंगळवारी कमाल तापमान 30.8 अंश सेल्सिअस नोंदले गेले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cloudy weather has led to the disappearance of cooling temperatures in maharashtra