स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव नाही - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 ऑगस्ट 2016

मुंबई - विदर्भ स्वतंत्र राज्य करण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारपुढे नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.

स्वतंत्र विदर्भ आणि अखंड महाराष्ट्र वादावरुन विधीमंडळ सभागृहात आज (सोमवार) जोरदार घोषणाबाजी झाली. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेना आमदारांनी अखंड महाराष्ट्राचे समर्थन करत, स्वतंत्र विदर्भाबाबत सरकारची भूमिका मांडण्यासाठी भाजपला धारेवर धरले. दोन्ही सभागृहात वेलमध्ये उतरुन अखंड महाराष्ट्राच्या घोषणा देण्यात आल्या.

यावर स्पष्टीकरण देताना फडणवीस म्हणाले की, छोटी राज्य बनविण्याचा निर्णय हा केंद्र सरकारकडून घेण्यात येतो. संसदेत स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, आमच्यापुढे असा कोणताही प्रस्ताव नाही.

Web Title: CM