esakal | मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार; राहुल गांधींचा फेक व्हिडीओ केला शेअर (व्हिडिओ)
sakal

बोलून बातमी शोधा

cm devendra fadanvis share fake video of rahul gandhi

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधींनी केलेलं भाषण मॉर्फ करुन, एडिटींग करुन बदल करण्यात आला आहे. याबाबत साकेत गोखले यांनी आरोप केले असून सायबर क्राईम आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

मुख्यमंत्र्यांविरोधात तक्रार; राहुल गांधींचा फेक व्हिडीओ केला शेअर (व्हिडिओ)

sakal_logo
By
वृत्तसंस्था

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फेसबुक पेजवरुन काँग्रेसचे नेते राहुल गांधींच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राहुल गांधींनी केलेलं भाषण मॉर्फ करुन, एडिटींग करुन बदल करण्यात आला आहे. याबाबत साकेत गोखले यांनी आरोप केले असून सायबर क्राईम आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरुनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आल्यामुळे मोठा वाद होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि हरयाणा येथील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी या व्हिडीओचा गैरवापर करण्यात येत आहे. त्यामुळे, हा आदर्श आचारसंहितेचा भंग असून याबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे साकेत यांनी म्हटले आहे.

आणखी बातम्या वाचा :

रुग्णालयातून बाळ गेले चोरीला

आदित्य ठाकरे निवडणूक जिंकतील, पण...

loading image