

Maharashtra Traffic Police Body Camera
ESakal
महाराष्ट्रातील वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडी-वॉर्न कॅमेरे (बीडब्ल्यूसी) बसवण्यात येणार आहेत. गोवा पोलिसांप्रमाणेच नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल फक्त असे पोलीसच चलन काढू शकतात, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधान परिषदेत सांगितले. वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बॉडीवॉर्न कॅमेरे टप्प्याटप्प्याने सुरू केले जातील, ज्याची सुरुवात प्रमुख शहरांपासून होईल, असे त्यांनी सांगितले.