मुख्यमंत्री फडणवीस शिवाजी महाराजांच्या चरणी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

भाजप आणि शिवसेनेचे आमदारा भगवे फेटे परिधान करून विधानभवनात आले. त्यांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला. मुख्यमंत्री फडणवीस व आदित्य ठाकरे जल्लोषाएकत्र सहभागी झाले होते. 

मुंबई : मराठा समाजाला स्वतंत्रपणे 16 टक्के आरक्षण देण्याबाबतचा मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाचा कृती आराखडा सादर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण केला. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
मराठा आरक्षणाबाबतच्या कृती आराखड्याला राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात सादर केला. मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षण देण्यासाठी घटनेच्या 15 (4) आणि 16 (4) या कलमांचा आधार घेण्यात आला आहे. निवडणुकीत आरक्षण मिळणार नसून, ओबीसांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले आहे. आराखडा सादर केल्यानंतर मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेच्या आमदारांनी जल्लोष साजरा केला.

भाजप आणि शिवसेनेचे आमदारा भगवे फेटे परिधान करून विधानभवनात आले. त्यांनी शिवाजी महाराजांचा जयघोष केला. मुख्यमंत्री फडणवीस व आदित्य ठाकरे जल्लोषाएकत्र सहभागी झाले होते. 

Web Title: CM Devendra Fadnavis Shivaji Maharajs feet after tabled Maratha Reservation ATR