Mumbai building collapse : इमारत दुर्घटनेची चौकशी करू : मुख्यमंत्री

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis

मुंबई : शंभर वर्षे जुनी इमारत ही इमारत असून, तेथील नागरिकांनी रिडेव्हलपमेंटसाठी विकसक नियुक्त केला होता. त्याचे काम सुरू झाले होते. म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींच्या यादीत या इमारतीचा समावेश नव्हता, अशी माहिती मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनी दिली. 

डोंगरी परिसरात एका चार मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे. डोंगरी परिसरातील केसरबाग या 4 मजली इमारतीचा अर्धा भाग आज (मंगळवार) सकाळी कोसळला. या  इमारतील एकूण 10 कुटुंबे राहत होती. यातील 30 ते 40 जण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. 

याविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, की विकसकाने त्याचे काम वेळेत आणि व्यवस्थित पूर्ण केले आहे की नाही, याची चौकशी केली जाईल. सध्या तरी प्राधान्य अडकलेल्यांना सुखरूप बाहेर काढण्यास आहे. ही जागा दाटीवाटीची आहे. त्यामुळे राजकीय नेते किंवा इतरांना आवाहन केले आहे, की घटनास्थळी जाऊ नये; बचावकार्याला प्राधान्य दिले जात आहे. एकूण 15 कुटुंबे राहत होती. याठिकाणी गर्दी न करता मदतकार्यात अडथळा आणू नये. जखमींना योग्य ती मदत करण्याचे आदेश मंत्र्यांना दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com