
Maharashtra CM Hits Back at Critics Over Rs 5 Collection for Flood Victims
Esakal
लोणी इथं सहकारमहर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते पार पडलं. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रवरा उद्योग समुहाच्यावतीने राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी एक कोटी रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात आला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रवरा उद्योग समुहाचे यासाठी आभार मानले. तसंच भाषणातून साखर कारखान्यांकडून प्रति टन ५ रुपये शेतकऱ्यांच्या मदतीच्या निर्णयावर टीका करणाऱ्यांवर घणाघात केला.