देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न होताः मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

मुंबई: कोरेगाव भीमा प्रकरणी पुणे पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्यच होती. पोलिसांनी न्यायालयात सर्व पुरावे मांडले आहेत. पोलिसांनी सादर केलेले पुरावे नक्षलवाद्यांशी संबंधित आहेत. देशाला अस्थिर करण्याचा प्रयत्न आहे. ज्याचे पुरावे पुणे पोलिसांनी सादर केले आहेत. अशा लोकांना राजकीयदृष्या समर्थन दिले जात असेल तर आपण कोणाला समर्थन देत आहोत याचा विचार केला गेला पाहिजे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फणडणवीस आज (शुक्रवार) म्हणाले.

पत्रकार परिषदेत बोलताना फडणवीस म्हणाले, 'पोलिसांनी घेतलेली भूमिका योग्य की अयोग्य हा वादाचा विषय असू शकतो. त्यावेळी अनेकजण ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात येत असल्याचा आरोप करत असल्याने पोलिसांनी पत्रकार परिषद घेत पुरावे सादर केले होते. मात्र यामुळे देशाविरोधात कट रचला गेला हा मुद्दा दुर्लक्षित करु शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणामुळे देशाच्या विरोधातील कट, वेगवेगळ्या समाजांमध्ये द्वेष निर्माण करुन, अंतर्गत वाद निरमाण व्हावा हा प्रयत्न उघड होत आहे. देशाच्या पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे, समाजात द्वेष निर्माण करणारे गजाआड जातील.'

नक्षलवादी संघटनांशी संबंध असल्यावरून कारवाई केलेले कवी वरवरा राव, अ‍ॅड. सुधा भारद्वाज, अ‍ॅड. अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि गौतम नवलखा यांच्या अटकेत हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करताना पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचणारे गजाआड जातील असा विश्वास व्यक्त केला. सर्वोच्च न्यायालायाच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले आहे. पोलिसांची कारवाई ही कोणत्याही राजकीय दृष्टीकोनातून नव्हती हे सर्वोच्च न्यायालायाने मान्य केल्यामुळे पुणे पोलिसांच्या कारवाईवर शिक्कामोर्तब झाले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नजरकैद अजून चार आठवड्यांसाठी वाढवण्यात आली आहे. शिवाय, या पाच जणांना जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात जाण्याचा मार्ग मोकळा असेल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज (शुक्रवार) नमूद केले.

Web Title: cm devendra fadnavis welcomes sc judgement on five activists arrested by pune police