खुद्द मुख्यमंत्री फडणवीस उदयनराजेंना घेऊन जाणार दिल्लीला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ते आज (शुक्रवार) सायंकाळी पुणे विमानतळावरून चार्टर्ड विमानाने दिल्लीला जाण्यासाठी रवाना होणार आहेत.

पुणे : साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ते आज (शुक्रवार) सायंकाळी पुणे विमानतळावरून चार्टर्ड विमानाने दिल्लीला जाण्यासाठी रवाना होणार आहेत. यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे भोसले यांना घेऊन निघणार आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर उदयनराजे भोसले यांनी पुन्हा एकदा आपला निर्णय बदलत भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी (ता.14) भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाबरोबर चर्चा करून राजीनामा दिल्यानंतर रविवारी साताऱ्यात येणाऱ्या महाजनादेश यात्रेत ते समर्थकांबरोबर भाजपमध्ये प्रवेश करतील, असे त्यांच्या साताऱ्यातील जवळच्या समर्थकांकडून समजत आहे.

देशातील 17 राष्ट्रीयीकृत बॅंकांमध्ये नोकरीची संधी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM Devendra Fadnavis will take Udayanraje Bhosale to Delhi