कारगिल विजय दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांची शहीदांना मानवंदना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जुलै 2019

कारगिल विजय दिनानिमित्त तिन्ही सैन्य दलांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन केले तसेच मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेश वहीत भावना व्यक्त केल्या.

मुंबई : कारगिल विजय दिनानिमित्त तिन्ही सैन्य दलांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना अभिवादन केले तसेच मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेश वहीत भावना व्यक्त केल्या.

फडणवीस म्हणाले की, "कारगिल विजयदिन हा आपल्यासाठी अभिमानाचा आणि आपल्या वीर जवानांच्या शौर्याला सलाम करण्याचा क्षण आहे. या शहीदांनी आपल्या भविष्यासाठी त्यांचा आज म्हणजे वर्तमान त्यागले आहे, ही भावना सदैव जागृत ठेवावी लागेल. शहीदांचा त्याग आणि समर्पण वाया जाऊ न देण्याचा प्रण करावा लागेल. त्यासाठी आपल्याला, देशाला सर्वोच्च स्थानी नेण्यासाठी प्रयत्न करू या."

भारतीय लष्कर, वायूसेना आणि नौसेना यांच्या वतीने कुलाबा लष्करी तळाच्या  प्रांगणात हा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्मारकास पुष्पचक्र अर्पण केले. तिन्ही दलांच्या सशस्त्र तुकड्यांनी शहीद स्मारकास मानवंदना दिली. यावेळी लेफ्टनंट जनरल एस.के.प्राशर, व्हाईस ॲडमिरल अजितकुमार पी. यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CM devendra fadnvis Hostility for martyrs on the occasion of Kargil victory