EKnath Shinde| "पंतप्रधान देवेंद्र फडणवीस..अर्रर्र..."; मुख्यमंत्री शिंदेंनी चावली जीभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath shinde Devendra Fadnavis
"पंतप्रधान देवेंद्र फडणवीस..अर्रर्र..."; मुख्यमंत्री शिंदेंनी चावली जीभ

"पंतप्रधान देवेंद्र फडणवीस..अर्रर्र..."; मुख्यमंत्री शिंदेंनी चावली जीभ

शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून या दोघांच्या अनेक गोष्टी चर्चेचा विषय ठरल्यात. उदाहरणार्थ, माईक ओढणं, चिठ्ठी ठेवणं, एकत्र दौऱ्यांवर जाणं, भर पत्रकार परिषदेत हळूच कानात काहीतरी सांगणे. मात्र आता या सगळ्यासोबत आणखी एक गोष्ट चर्चेत आली आहे. ती म्हणजे एकनाथ शिंदेंच्या भाषणातला देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख. (CM Eknath shinde about Devendra fadnavis)

हेही वाचा: भाजपा पुरस्कृत CM होताच मराठी माणूस आणि शिवरायांचा अपमान सुरू झाला - संजय राऊत

एकनाथ शिंदे (Eknath shinde)सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते नाशिकमध्ये पोलीस वसाहतीच्या उद्घाटनावेळी बोलत होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख चक्क देशाचे पंतप्रधान म्हणून केला. आता हे चुकून शिंदेंच्या तोंडून बाहेर पडलं. त्यामुळे लगेचच त्यांनी जीभ चावली आणि आपली चूक सुधारली. मात्र यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

हेही वाचा: CM पदासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी प्रतारणा केली - मुख्यमंत्री शिंदे

मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यापासून एकनाथ शिंदेंचा हा पहिलाच महाराष्ट्र दौरा आहे. गेल्या साधारण महिनाभरापासून मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच सरकार चालवत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जात आहे.

Web Title: Cm Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Tour Pm Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..