CM Shinde: मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर; म्हणाले, 'हृदय पिळवटून टाकणाऱ्या..' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CM eknath shinde expressed condolences on 7 warkari death in accident announced 5 lakh aid for families

CM Shinde: मृत वारकऱ्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर; म्हणाले, 'हृदय पिळवटून टाकणाऱ्या..'

सोलापूर: विठ्ठलाच्या दर्शनासाठी कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरला निघालेल्या वारकऱ्यांच्या दिंडीत कारने चिरडल्याने आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना सांगोला तालुक्यातील जुनोनी येथी घडली. या भीषण अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. सोबतच त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपये मदतीची घोषणा देखील केली आहे.

"कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला मिरज मार्गावर वाहनाने धडक दिली. हृदय पिळवटून टाकणाऱ्या या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारकरी बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली." असे ट्विट मुख्यमं६ी एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

"मृत वारकरी बांधवांच्या नातेवाईक आणि आप्तेष्टांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली असून जखमी वारकरी बांधवांना तातडीने योग्य ते उपचार देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत." असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

हेही वाचा: Kartiki Wari: पंढरपूरला निघालेल्या दिंडीत कार घुसली, सात वारकऱ्यांचा मृत्यू

हेही वाचा: Instagram Outage: इंस्टाग्राम युजर्ससाठी मोठी बातमी! अचानक अकाउंट होतायेत सस्पेंड

या अपघातात पाच महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर जखमी झालेल्या सहा वारकरी जखमी झाले असून सांगोला येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

टॅग्स :CM Eknath Shinde