Budget Session 2023 : देशद्रोह्याला देशद्रोही म्हणणं चुकीचं असेल तर मी ५० वेळा ती चूक करेन - एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हक्कभंग आणला आहे.
Eknath shinde
Eknath shinde Esakal

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी हक्कभंगाचा प्रस्ताव आणला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे आज सभागृहामध्ये आक्रमक पवित्र्यात दिसले. त्यांनी सभागृहात नवाब मलिकांचं नाव घेत टीका केली आहे. तसंच आपल्या विधानाचा बचावही केला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "सदस्यांनी परिषदेत माझा विरोधात जो हक्कभंग आणला आहे. ते वक्तव्य विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याबाबत नव्हते. नवाब मलिक यांचे संबंध देशद्रोहाचा गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तींशी होते. गोवावाला कंपाऊडच्या जमिनीवर मलिकांनी अवैध कब्जा घेतला.

मलिक यांनी हसीना पारकर यांच्याकडून जमीन घेतली. ९३च्या बाॅम्ब स्फोटातील आरोपीचाही यात सहभाग आहे. मलिक यांना ईडीकडून अटक झाली. NIA नेही चौकशी केली.मलिकांची प्राॅपर्टीही यात जप्त झाली आहे. त्यांच्यावर UAPA अंतर्गत गुन्हाही दाखल केला आहे. देशद्रोही नवाब मलिक यांचा मी उल्लेख केला. त्यांचे देशद्रोह्यासोबतचे संबंध समोर आलेले आहेत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले," त्या मलिक यांचा राजीनामा यांनी घेतला नाही. त्यांना पाठिशी घातलं. त्यावेळी बरं झालं मी त्यांच्यासोबत चहापान टाळलं,असं मी बोललो. अंबादास दानवेजी तुम्हाला हे योग्य वाटतं का ? देशद्रोह्यांना पाठीशी घातलं म्हणून आम्ही त्यांची साथ सोडली. अजित दादांना मी देशद्रोही म्हटलो नाही. या वक्तव्याला राजकिय रंग देऊ नये. या देशद्रोह्याचं समर्थन आपण करता का ? देशद्रोह्याला देशद्रोही बोलणं हे चुकीचं असेल तर मी ५० वेळा ती चूक करेन."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com