
एकिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर प्रोटोकॉल न पाळल्याने अधिकारी नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. तर आज दुसरीकडे मुख्यमंत्री शिंदे पुण्यात दाखल झाले असता शहरातील मध्यवर्ती भागात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी तसेच मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील असलेल्या पोलिसांनी पत्रकारांना धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली. (Cm Eknath Shinde pune visit Journalists were beaten up by the police in the convoy)
पुणे शहरात आज दुपारी दोनच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावली अशातच शहरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील गणपती मंडळांना भेटी देण्यासाठी शहरात आले होते. यामुळे स्थानिक नागरिकांची तसेच भाविकांची याशिवाय पोलिसांची देखील मोठी तारांबळ उडालेली पाहायला मिळाली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौऱ्यावर असताना शहरातील मध्यवर्ती भागात असणारे अनेक रस्ते वाहतूक पोलिसांनी बंद केले होते. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात प्रचंड मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पहिल्यांदा पुण्यातील कसबा गणपतीच दर्शन घेतलं. यावेळी गोंधळ पाहायला मिळाला.
मुख्यमंत्री शिंदेंना पत्रकारांनी घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वतः पत्रकारांना शांतपणे बाजूला करत होते. मात्र, पोलिसांनी दम दाटी करत पत्रकारांना धक्काबुक्की केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यकारभार हाती घेतल्यापासून आता जवळपास दोन महिने झाले आहेत. मात्र या दोनच महिन्यात एकनाथ शिंदेंवर अधिकारी वर्ग नाराज असल्याची चर्चा आहे. शिंदे प्रोटोकॉल पाळत नसल्याने अधिकारी वर्ग त्रस्त आहे.
शिंदेंच्या नियोजित दौऱ्याची कोणतीही माहिती मिळत नाही. तसंच नियोजित दौऱ्यात अनेकदा परस्पर फेरफार केली जाते. या बदलाची माहिती पोलीस आणि इतर अधिकाऱ्यांनाही नसते. त्यामुळे सुरक्षेसाठी असलेल्या आणि तैनात असलेल्या पोलिसांनाही ताटकळत उभं राहावं लागतं. अशी तक्रार अधिकाऱ्यांनी केली असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.