Eknath Shinde : 'त्यांनी 2019मध्ये गहाण ठेवलेला धनुष्यबाण मी सोडवून आणला' शिंदे जोरात

uddhav thackeray and eknath shinde
uddhav thackeray and eknath shindeesakal

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण चिन्हासह शिवसेना हे पक्षाचं नाव मिळालं आहे. निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.

या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. २०१९ मध्ये त्यांनी (उद्धव ठाकरेंनी) ज्यांच्याकडे धनुष्यबाण गहाण ठेवला होता त्यांच्याकडू मी सोडवून आणला, अशी बोचरी टीका मुख्यमंत्री शिंदेंनी केली आहे. २०१९मध्ये शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्तास्थापन केल्याचा मुद्दा यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.

uddhav thackeray and eknath shinde
Shivsena : शिवसेना अन् धनुष्यबाण तर गेलाच... आता उद्धव ठाकरेंची 'मशाल'सुद्धा धोक्यात?

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

  • 'शिवसेना' हातची निसटल्यानंतर त्यांच्याकडून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे

  • निवडणूक आयोग आणि न्यायव्यवस्था या स्वतंत्र यंत्रणा आहेत

  • या यंत्रणांवर खालच्या पातळीवरचा आरोप करणं चूक आहे

  • अशा वक्तव्यातून लोकशाहीचा खून होतोय

  • यापुढे तरी तुमच्यामध्ये सुधारणा होऊ द्या

  • आम्ही ५० आमदार चोर, १३ खासदार चोर, शेकडो शिवसैनिक चोर आहोत का?

  • तुम्ही कधीतीर आत्मपरिक्षण करणार आहात की नाही?

  • स्वतःमध्ये सुधारण्याचा आणि आत्मचिंतन करण्याचा प्रयत्न करा, हा माझा सल्ला आहे

uddhav thackeray and eknath shinde
Shiv Sena : 'कागदावरचा चोरला, परंतु बाळासाहेब ज्याची पूजा करायचे तो धनुष्यबाण कसा चोरणार?'

उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गेलं आहे. पण सध्या ठाकरे यांच्याकडे सध्या असलेले 'मशाल' हे चिन्ह आणि 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नावही जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मशाल चिन्ह आणि नाव हे ठाकरे यांना पोटनिवडणुकीसाठी तात्पुरते देण्यात आले होते.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते ?

  • शिंदे गटाने केवळ कागदावरचा धनुष्यबाण चोरला आहे

  • शिवसेनाप्रमुखांच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाण ज्याची पूजा आम्ही आजही करतो, तो कसा चोरणार?

  • स्वतः बाळासाहेब पूजा करायचे तो धनुष्यबाण आमच्याकडेच आहे

  • नामर्दांनो, तुम्हाला ही चोरी पचणार नाही

  • आमचा विश्वास न्यायमूर्तींवर आहे, कोर्टात काय होतं ते पाहावं लागेल

  • भाजपने देशातल्या निवडणुका संपवून एकछत्री कार्यक्रम सुरु करावा

  • निवडणूक आयोगाने ठरवून निकाल दिलेला आहे

  • ज्या पद्धतीने हलकटपणा चालला आहे, त्यावरुन उद्या हे मशालही काढून घेतील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com