एकनाथ शिंदे दिघेंना म्हणाले, मला तिकीट मिळालं नाही तरी चालेल, युती तोडू नका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm eknath shinde share anand dighe bjp alliance incident floor test in maharashtra politics

एकनाथ शिंदे दिघेंना म्हणाले, मला तिकीट मिळालं नाही तरी चालेल, युती तोडू नका

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झालं आणि मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेला सत्तासंघर्ष अखेर संपला आहे. सरकारने विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जिंकत पहिली कसोटी पार केली नंतर शिंदे सरकारने बहुमत चाचणी देखील जिंकली विधानसभेत बहुमत देखील सिध्द केलं. या चाचणीत सरकारला १६४ मते पडली, तर सरकारविरोधात ९९ मते पडली आहेत. दरम्यान एकनाथ शिंदे आज विधानसभेत बोलताना अत्यंत आक्रमक शैलीमध्ये दिसले. (cm eknath shinde share anand dighe bjp alliance incident floor test in maharashtra politics)

एकनाथ शिंदे म्हणाले की, २०-२५ वर्ष एकनाथ शिंदेने रक्ताचं पाणी केलंय. मी १७ वर्षांचा होतो. बाळासाहेबांच्या विचाराने मी वेडा झालो आणि शिवसैनिक झालो. एका प्रकरणामध्ये मी आनंद दिघेंच्या संपर्कात आलो. वयाच्या १८ व्या वर्षी शाखाप्रमुख झालो. अनेकजण सिनियर होते. त्यांना बोललो की यांना करा, तर माझ्या खांद्यावर हात टाकून बोलले, “मला शिकवतो का?”

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी १९९७ साली नगरसेवक झालो, पण पाच वर्ष अधीच होऊ शकलो असतो. दिगंबर धोत्रे हा भाजपचा कार्यकर्ता होता. युतीमध्ये त्याला तिकीट देण्याचा निर्णय झाला, दिघे म्हणाले की युतीचं काय ते बघू, तुला तिकीट देतो.. यावर मी त्यांना सांगीतलं, युती तोडू नका मी पाच वर्षांनंतर नगरसेवक होईल. ही वस्तुस्थिती आहे, मी कधीही पदाची लालसा केली नाही. तिथून माझी सुरूवात झाली". असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगीतलं.

हेही वाचा: मुलांच्या आठवणीत CM एकनाथ शिंदे भावूक

भाषणादरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुलांच्या आठवणीत भावूक झाल्याचे पाहायला मिळालं, माझा श्रीकांत डॉक्टर झाला. पण मी त्याला वेळ देऊ शकलो नाही. मी लेट यायचो आणि तो आधी निघून जायचा. मी संघटनेला वेळ दिला. शिवसेना हेच माझं कुटुंब मानलं. मा‍झ्या आयुष्यात वाईट प्रसंग आला. माझी मुलं माझ्यासमोर डोळ्यासमोर गेली. तेव्हा मला दिघेंनी आधार दिला. असे सांगत एकनाथ शिंदे भावुक झाले. त्यांना यावेळी अश्रू अनावर झाले.

हेही वाचा: एकनाथ शिंदे नॉट रिचेबल ते बहुमत चाचणी जिंकण्यापर्यंतच्या घडामोडी

बंड का केलं? याच कारण शोधण गरजेच होत. विधान परिषद निवडणुकीत मिळालेल्या वागणुकीमुळे अस्वस्थ होतो. माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. असे आरोप शिंदे यांनी यावेळी केले.

Web Title: Cm Eknath Shinde Share Anand Dighe Bjp Alliance Incident Floor Test In Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..