CM एकनाथ शिंदे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं बघायला आवडेल - सुषमा अंधारे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray Eknath Shinde
CM एकनाथ शिंदे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं बघायला आवडेल - सुषमा अंधारे

CM एकनाथ शिंदे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं बघायला आवडेल - सुषमा अंधारे

शिवसेना नेत्या सुषमा अंधारे आपल्या दसरा मेळाव्याच्या भाषणानंतर चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यांनी शिंदे गटाने परत यावे अशी अपेक्षा बोलून दाखवल्याने चर्चेत आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, असं आपल्याला बघायला आवडेल, असंही अंधारे म्हणाल्या आहेत. तसंच कुटुंब जोडण्यावर भर दिला पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी घेतली आहे.

हेही वाचा: Dasara Melava : "त्यादिवशी अंगात संचारलं"; संजय राऊतांची आठवण काढत सुषमा अंधारे म्हणाल्या...

एका खासगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमामध्ये सुषमा अंधारे बोलत होत्या. यावेळी शिंदे गट परत येईल का असा प्रश्न सुषमा अंधारे यांनी विचारला असता, त्या म्हणाल्या, "मला वाटतं, यावं त्यांनी परत. सुबह का भुला शाम को घर आए तो उसे भुला नही कहते. सतत सतत त्यांना बोलून ती दरी वाढवू नये, ती कमी करण्याचे प्रयत्न करावे. कुटुंबातल्या लेकी, बायका, कुटुंब जोडण्याचा प्रयत्न करतात. कुटुंब तोडण्यापेक्षा जोडण्यावर भर द्यावा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असं बघायला आवडेल. एकनाथ शिंदे मनाने काही करतात असं मला वाटतंच नाही. कळसुत्री बाहुल्यांचा सूत्रधार देवेंद्र फडणवीस आहेत."

हेही वाचा: Shiv Sena symbol frozen by EC : उद्धव यांनी सहकाऱ्यांना पाठवले चिन्ह?

शिंदे गटासोबत भाजपाही आली तर काय, असं विचारलं असता आपण पक्ष सोडू, असंही त्या म्हणाल्या आहेत. अंधारे म्हणाल्या, "भाजपा शिवसेनेत सोबत यावी असं वाटत नाही. भाजपा येईल आणि मी जाईन अशी भीती मला वाटते. कारण भाजपा त्यांचा स्थायीभाव सोडणार नाहीत. ते तुकडे तुकडे गँगचं राजकारण करतात."

हेही वाचा: Shrikant Shinde: उद्धव ठाकरेंच्या टीकेचे पुण्यात पडसाद; झळकले 'दुखावलेला बाप'चे फ्लेक्स

शिंदे गट परत आल्यास उद्धव ठाकरेंची भूमिका काय असेल, याविषयी आपलं मत मांडताना सुषमा अंधारे म्हणाल्या,"उद्धव ठाकरेंबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या गेल्यात की ते भेटत नाहीत, वेळ देत नाहीत. पण मला कुठेही तसं वाटत नाही. शिंदे गटातल्या या लोकांनी इतक्या वाईट पद्धतीने, उथळ पद्धतीने टीका सुरू केल्या. त्यांनी अजेंड्यावर बोलावं, काम करण्यातच्या पद्धतीवरही बोललं चालेल. जेव्हा कुटुंबावर शिंतोडे उडवले जातात, तेव्हा ते सहन होत नाही.