Eknath Shinde : राज्यातील शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडणार नाही; मुख्यमंत्र्यांची अंबाबाई दर्शनानंतर ग्वाही

सरकार शेतकऱ्यांचेच असून, त्यांच्या बाजूने सर्व निर्णय होतील.
CM Eknath Shinde visited Ambabai Temple
CM Eknath Shinde visited Ambabai Templeesakal
Summary

'सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत. सरकारतर्फे वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.'

कोल्हापूर : सरकार शेतकऱ्यांचेच असून, त्यांच्या बाजूने सर्व निर्णय होतील. कारखान्यांना शेतकऱ्यांची देय रक्कम द्यावी लागेल. यंदाच्या ऊसदराचा तिढाही लवकरच सुटेल. शेतकऱ्यांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी येथे दिली.

शिंदे यांनी सहकुटुंब करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे (Ambabai Temple) दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, देवस्थान समितीतर्फे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी त्यांचे स्वागत केले. ऊसदर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिंदे म्हणाले, ‘‘सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत. सरकारतर्फे वर्षाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतात.

CM Eknath Shinde visited Ambabai Temple
Sadabhau Khot : राजू शेट्टींची 'ही' मागणी पूर्ण झाल्यास, मी राजकारण सोडतो; सदाभाऊंचं ओपन चॅलेंज

यंदाच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिकही शेतकऱ्यांच्या बाजूनेच आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून लवकरच सकारात्मक निर्णय होतील.’’ ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यावरील सर्व संकटे दूर होवोत. राज्य सुजलाम सुफलाम होवो आणि जनतेला सुख, समृध्दी, ऐश्वर्य लाभू दे, असे साकडे श्री अंबाबाईला घातले आहे.

मनोज जरांगे-पाटील ठाण्यात माझ्याविरोधात सभा घेत नाहीत तर ते मराठा बांधवांना भेटण्यासाठी सभा घेत आहेत. कुणावरही अन्याय न होता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीतच आरक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे आणि त्यासाठी युध्द पातळीवर काम सुरू आहे.’’

CM Eknath Shinde visited Ambabai Temple
आता आरपारची लढाई! मुश्रीफ-सतेज पाटलांना गुडघे टेकायला लावणार; ऊसदरावरुन शेट्टींचा आक्रमक पवित्रा

यावेळी खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, आमदार प्रकाश आबिटकर, माजी आमदार चंद्रदीप नरके, सुजीत चव्हाण, शिवाजीराव जाधव आदी उपस्थित होते.

परिसर चकाचक, वाहतूक कोंडी

मुख्यमंत्री मंदिरात येणार, याची माहिती मंदिर व्यवस्थापनाला दुपारी दोननंतर समजली. त्यानंतर मग ते येण्याच्या मार्गावर तत्काळ स्वच्छता मोहीम सुरू झाली. दरम्यान, पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे दाखल झाला. मंदिरात दर्शनासाठी भाविकांचीही गर्दी होती. त्यामुळे मुख्यमंत्री आल्यानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दर्शन रांगही काही काळ थांबवण्यात आली. शाळा सुटण्याची वेळ असल्याने वाहतुकीचीही काही ठिकाणी कोंडी झाली.

CM Eknath Shinde visited Ambabai Temple
Hasan Mushrif : ऊसदर आंदोलन चिघळलं! मुश्रीफांनी स्वाभिमानीला केलं 'हे' आवाहन; म्हणाले, राजू शेट्टींनी बिनबुडाचे..

अंध विक्रेत्याकडून खेळणी खरेदी

मुख्यमंत्री शिंदे यांनी सहकुटुंब श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी मातृलिंग मंदिरातही जावून दर्शन घेतले. त्यांचे सायंकाळी साडेचारच्या सुमारास मंदिर परिसरात आगमन झाले. त्यानंतर त्यांचा नातू रुद्रांश याचे लक्ष शेजारील खेळणी विक्रेत्याकडे जाताच त्याने तिकडे धाव घेतली. तेथील अंध विक्रेता रवींद्र गाडेकर यांच्याकडून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी खेळण्याची खरेदी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com