Eknath Shinde Wife Dance: 'बघतोय रिक्षावाला'वर CM शिंदेंच्या बायकोचा भन्नाट डान्स, व्हिडीओ पाहिला का?

CM Eknath Shinde Wife Dance Video viral: या आधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी ड्रम वाजवला होता. त्याचाही व्हिडीओ व्हायरल झाला होता.
CM Eknath Shinde Wife Dance Video viral
CM Eknath Shinde Wife Dance Video viralSakal

CM Eknath Shinde Wife Dance Video viral: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. शपथविधीनंतर त्यांनी एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी ड्रम वाजवला होता. त्यानंतर आता त्यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

लता शिंदे यांचा डान्स करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्या काही महिलांसोबत "वाट माझी बघतोय रिक्षावाला" या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ठाणेतल्या कोपरी इथला हा व्हिडीओ असल्याचं सांगितलं जात आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे.

चैत्र नवरात्रीनिमित्त सध्या अनेक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. ठाण्यातल्या कोपरी इथल्या अशाच एका नवरात्रौत्सव कार्यक्रमामध्ये लता शिंदे याही उपस्थित होत्या. तिथे त्यांनी हा डान्स केल्याचं सांगितलं जात आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यावर ते गुवाहाटीला गेले होते. तिथून परतले आणि थेट मुख्यमंत्री पदाचा शपथविधी झाला. या शपथविधीनंतर जेव्हा ते ठाण्यामध्ये गेले, त्यावेळी लता शिंदे यांनी त्यांच्या स्वागतासाठी ड्रमही वाजवला होता. त्या वेळीही त्यांच्या कलेचं आणि धाडसाचं जोरदार कौतुक होत होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com