CM Shinde : मिसेस मुख्यमंत्री पोहोचल्या अक्कलकोटच्या अन्नछत्रात; वाढपी बनून केली सेवा

cm eknath shinde
cm eknath shinde esakal

अक्कलकोटः राज्यात एकीकडे सत्ता समीकरण रंगलेलं असतांना आणि मंत्रिमंडळ विस्ताराची धामधूम सुरु असतांना मिसेस मुख्यमंत्री अक्कलकोट संस्थानात पोहोचल्या आणि त्यांनी तिथे सेवा दिली आणि सर्वसामान्य लोकांप्रमाणे रांगेत बसून प्रसाद ग्रहण केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसामान्य माणसात मिसळून कायमच आपण त्यांच्यातील एक असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यादेखील त्याला अपवाद नाहीत. याचा प्रत्यय नुकताच अक्कलकोट येथे पहायला मिळाला.

cm eknath shinde
Pradeep Kurulkar : डॉ. प्रदीप कुरुलकरचे विवाहबाह्य संबंध; महिलेसोबतचे चॅटिंग एटीएसला मिळाले

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त त्या तसेच शिंदे कुटुंबातील काही सदस्यांनी यांनी नुकतीच अक्कलकोट येथे जाऊन श्री स्वामी समर्थांच्या पादुका तसेच समाधीस्थळाचे दर्शन घेतले. यानंतर प्रथेप्रमाणे त्यांनी अन्नछत्राला भेट दिली. मात्र यावेळी त्यांनी सर्वसामान्य सेवेकरी बनून स्वामीभक्तांना अन्नदान करण्याची इच्छा व्यक्त केली.

त्यानंतर त्यांनी स्वतः हातात भाजी आणि भाताचे भांडे घेऊन वाढपी बनून सर्वसामान्य भक्तांना आग्रहपूर्वक प्रसाद वाढला. तसेच त्यांना वाढून झाल्यानंतरच स्वतः आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या सोबत सर्वसामान्य भक्तासोबत बसून प्रसाद ग्रहण केला. मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचा हा साधेपणा पाहून उपस्थित भक्तगण देखील मनोमन सुखावले.

cm eknath shinde
Video : "दिल्ली तळ्यांचं शहर होतंय"; पावसात रस्त्यावर तळे, केजरीवालांच ते वक्तव्य तरूणांनी खरं ठरवलं

एकीकडे आमदार, खासदार दर्शनासाठी आले की त्यांचे दर्शन होईपर्यंत सर्वसामान्य भक्तांना ताटकळावे लागते. मात्र इथे मात्र मुख्यमंत्री शिंदे यांच्या पत्नी आपला मिसेस मुख्यमंत्रीपदाचा बडेजाव बाजूला ठेवून सर्वसामान्य भक्तांप्रमाणे प्रसाद वाढतायत आणि सोबत बसूनच तो ग्रहण करतायत हे पाहून उपस्थित भक्तगण अवाक् झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com