
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असणाऱ्या नगर विकास खात्याबाबत नाराजी व्यक्त केलीय. नगरविकास खात्याचा कारभार सुमार असून अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर सुधारणा कराव्या अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्यात. केंद्र सरकारच्या योजनांबाबत पुनरावलोकन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी नगर विकास विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.