शेतकरी कर्जमाफी कधी? मुख्यमंत्री फडणवीस यांनी तारीखच सांगून टाकली

CM Fadnavis on Farmer Loan राज्यातील खरीप हंगामपूर्व तयारीची आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृह इथं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.
Devendra Fadnavis latest news

Devendra Fadnavis latest news

Esakal

Updated on

राज्यातील खरीप हंगामपूर्व तयारीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, राज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत कर्जवाटपाच्या संदर्भात चर्चा झाली. जास्तीजास्त शेतकऱ्यांना कर्ज कसं मिळू शकेल यासंदर्भात सर्व तजवीज करण्यात आली. आपल्या जिल्हा सरकारी आणि ग्रामीण बँका ६७ टक्के शेतकऱ्यांना कर्ज देतात. तर राष्ट्रीयकृत बँका २६ टक्के शेतकऱ्यांना कर्ज देतात. त्यांचं टार्गेट ८० टक्के आहे. त्यांनी ८० टक्क्यांच्या वर टार्गेट पूर्ण केलं पाहिजे. CM Fadnavis Tells Banks Not To Ask Farmers For CIBIL

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com