फडणवीसांचे मुख्यमंत्रीपद अनिश्चित- शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

भाजप मंत्र्यांनो कोथळे सांभाळा!
भ्रष्टाचाऱयांचा आता कोथळा काढू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांनो, आपापले कोथळे सांभाळाच. मुख्यमंत्री थेट भ्रष्टाचाऱयांचे कोथळे बाहेर काढणार आहेत म्हणजे मंत्रिमंडळातील त्यांच्या भाजप सहकाऱयांच्या रक्तानेच मुख्यमंत्र्यांच्या हातातील सुरा रंगणार का? उद्या पराभवानंतर ते वेडेपिसे होतील. कारण ढोंग व खोटेपणाचा कोथळा जनता काढेल,' टोलाही शिवसेनेने लगावला आहे. 
 

मुंबई- 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘थापा’डे आहेत. त्यांची मुख्यमंत्रिपदाची खुर्ची ही फक्त शिवसेनेच्या पाठिंब्यावरच टिकून आहे. हे उद्या मुख्यमंत्री म्हणून राहतील की नाही याविषयी अनिश्चितता असतानाही हे महाशय मुंबईचे भवितव्य घडवायला निघाले आहेत,' अशा शब्दांत शिवसेनेने फडणवीस यांच्यासह भाजपची खिल्ली उडवली आहे. 

मंगळवारी मुंबईसह राज्यातील महापालिका आणि जिल्हा परिषदांसाठी उद्या (मंगळवार) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'तून मुख्यमंत्री व भाजपवर शेलक्या शब्दांत टीका करण्यात आली आहे. 

'जो उठतोय तो अफझलखानी विडा उचलतोय की, मुंबई घेणार म्हणजे घेणारच! भाजपवालेही अशा वल्गना करू लागले आहेत याची गंमत वाटते. त्यासाठी मुख्यमंत्री शिवसेनेकडे डोळे वटारून पाहत आहेत. मुंबईच्या नावाने रोज एक थाप मारली जात आहे. 

महाराष्ट्राची गरज म्हणून शिवसेनेने आपल्या खुर्चीस तात्पुरता टेकू लावला आहे हे विसरू नका, असा इशारा सेनेने दिला आहे. 
"मुख्यमंत्री म्हणून राज्याची जनता आपल्या पाठीशी देखील नाही. प्रचारासाठी गल्लीबोळ फिरण्याची वेळ राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर यावी, हाच त्यांचा पराभव आहे."

Web Title: CM fadnavis govt unstable- shiv sena