अजितदादांच्या निधनानंतर निधीची जुळवाजुळव करताना CM फडणवीसांची दमछाक; शासकीय खर्चासाठी आता नवी नियमावली

CM Devendra Fadnavis : नव्या निविदा काढण्यास आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यास अर्थ खात्यानं बंदी घातली आहे. अनावश्यक खर्च आणि खरेदी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
CM Fadnavis tightens finances bans new tenders approvals

CM Fadnavis tightens finances bans new tenders approvals

Esakal

Updated on

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्याकडे असलेल्या अर्थ खात्याची सूत्रे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च्या हाती घेतली आहेत. अर्थ खात्याची जबाबदारी घेताच फडणवीस यांनी उधळपट्टीला आळा घालण्यासाठी काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यात नव्या निविदा काढण्यास आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यास बंदी घालण्यात आलीय. अनावश्यक खर्च आणि खरेदी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याच्या तिजोरीवर ताण असल्याचं याआधी अनेकदा अजित पवार यांनी उघडपणे बोलून दाखवलं होतं. आता अजितदादांच्या निधनानंतर निधीची जुळवाजुळव करताना फडणवीसांची दमछाक होत असल्याचं म्हटलं जातंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com