

Fadnavis Explains Why BJP Gave Tickets To New Entrants
Esakal
Devendra Fadnavis: महापालिका निवडणुकीत उमेदवारीवरून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुक नाराज झाल्याचं दिसून आलं होतं. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी राज्यात अनेक ठिकाणी राडाही झाला होता. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिलीय. साम टीव्हीला ब्लॅक अँड व्हाइट विथ निलेश खरे या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत फडणवीस बोलले आहेत. निवडणुकीआधी अनेकांनी भाजप प्रवेश केला आणि त्यांना तिकीट देण्यात आलं पण निष्ठावंतांना डावललं असे आरोप भाजपवर झाले. या आरोपांवर बोलताना फडणवीस म्हणाले की, आम्ही केवळ ७ टक्के तिकिटं ही बाहेरून आलेल्यांना दिलीत. तर ९० टक्के तिकीटं ही पक्षातल्या लोकांना जे वर्षानुवर्षे काम करतायत त्यांना दिली आहेत.