
Uddhav Thackrey : उद्धव ठाकरे यांच्या ठाणे दौऱ्यावर CM शिंदेंची प्रतिक्रिया म्हणाले...
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर आणि शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जाणार आहे. आनंदमठ या आनंद दिघे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देणार आहेत. मात्र हे आनंदमठ आता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे मुख्य कार्यालय आहे असं असताना उद्धव ठाकरे या कार्यालयात जातील का? असा सवाल निर्माण झाला आहे.
उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी ध्वजारोहन झाल्यानंतर त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापल्या पक्षाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे ते जात असतील तर हरकत नाही असं शिंदे म्हणाले आहे.
हेही वाचा: Satyajeet Tambe : अपक्ष फॉर्म संदर्भात सत्यजीत तांबेंचा मोठा खुलासा
तर वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार यांच्याबद्दल केलेल्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार मोठे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकर देखील आमचे स्नेही आहे त्यामुळे त्यांच्या बाबत मी काय बोलणार असं शिंदे म्हणाले आहेत.
हे ही वाचा : ....इथं तयार होतो आपला लाडका तिरंगा
शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच ठाण्यात येणार आहेत. मात्र ते येण्याआधीच ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे. आज दुपारी ते टेंभी नाका येथील आनंदमठ या आनंद दिघे यांच्या निवासस्थानी उद्धव ठाकरे भेट देणार आहेत.
हेही वाचा: Jayant Patil: 'पहाटेची शपथविधी ही पवारांची खेळी'; जयंत पाटलांच्या वक्तव्याने खळबळ