"अजूनही 'त्या' मनाने युवासेनेच्या कार्यकर्त्या"; CM ठाकरेंकडून 'फायर आजीचं' कौतुक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cm uddhav thackeray and family visit chandrabhaga shinde at her home

"अजूनही 'त्या' मनाने युवासेनेच्या कार्यकर्त्या"; CM ठाकरेंकडून 'फायर आजीचं' कौतुक

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मातोश्रीबाहेर आंदोलनादरम्यान साऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्याआजी चंद्रभागा शिंदे यांच्या भेटीला त्यांच्या घरी पोहचले. पुष्पा स्टाईलमध्ये झुकेगा नही असा इशारा त्यांनी दिला होता. परळमध्ये आजींच्या घरी मुख्यमंत्री सहकुटुंब आभार मानण्यासाठी आजींच्या घरी पोहचले. ८० वर्षाच्या शिवसैनिक असलेल्या आजी मातोश्रीबाहेर आंदोलनात दोन दिवस उपस्थित होत्या.

या भेटीदरम्यान आजींनी मुंबईत शिवसेनाच येणार असे मुख्यमंत्र्यांना सांगितले. शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे व्यक्ती वयाने मोठी होते पण मनाने तरूण असली पाहीजे, ही आजी असल्या तरी अजूनही मनाने त्या युवा सेनेच्या कार्यकर्त्या आहेत. पण असे शिवसैनिक ही शिवसेना प्रमुखांनी दिलेला सगळ्यात मोठा आशिर्वाद आहे, म्हणून नतमस्तक होण माझ कर्तव्य होतं म्हणून आलो. काल इतक्या रणरणत्या उन्हात त्यांनी झुकेगा नही हा सल्ला त्यांनी दिला. बाळासाहेबांनी दिलेले हे शिवसैनिक झुकणारे नाहीत, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आजींची भेट घेतल्यानंतर सांगितलं, तसेच आजी आणि त्यांच्या कुटुंबियांना वर्षा बंगल्यावर येण्याचं मुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिलं.

हेही वाचा: ओला इलेक्ट्रिकचा मोठा निर्णय; परत मागवले 1,441 इलेक्ट्रिक स्कूटर

मला साहेबांसोबत इतकी वर्ष राहील्याची पोचपावती मिळाली, तसेच साहेब घरी आल्याचा खूप आनंद झाला, माझ्या घराला पाय लागले माझ्या नातवांना आशिर्वाद मिळाले त्याचा खूप आनंद झाला अशी प्रतिक्रीया आजींनी यावेळी दिली. सोबतच त्यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या नातासाठी नोकरी आणि घराची मागणी केली आहे. येत्या रविवारी आजींच्या नातवाचे लग्न आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना लग्नाची पत्रिकाही दिली आहे. काल अगदी तळपत्या उन्हात मातोश्रीबाहेर थांबून राणा दाम्पत्याचा विरोध त्यांनी केला होता.

हेही वाचा: ".. है क्या हिम्मत?"; नितेश राणेंचं शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान

आंदोलनातील सहभाग पाहून आजींना काहीवेळ मातोश्रीमध्येही बोलावण्यात आलं होतं. तसेच या आजीबाईंना पाहून शिवसेना कार्यकर्त्यांनीही रवी राणा कायर आहे, आजी आमची फायर आहे, अशा घोषणा दिल्या होत्या. या वेळी चंद्रभागा यांनी राणा दांपत्याला पुष्पास्टाईल इशारा देत झुकेगा नही साला, असे देखील म्हणाल्या होत्या.

Web Title: Cm Uddhav Thackeray And Family Visit Chandrabhaga Shinde At Her Home

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv Sena
go to top