ओला इलेक्ट्रिकचा मोठा निर्णय; परत मागवले 1,441 इलेक्ट्रिक स्कूटर

ओला इलेक्ट्रिक स्कूटर
ओला इलेक्ट्रिक स्कूटरGoogle

Ola Electric Recall Electric Scooters : ओला इलेक्ट्रिकने 1,441 इलेक्ट्रिक दुचाकी वाहने बाजारातून परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच इलेक्ट्रिक दुचाकीला लागलेल्या आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कंपनीने हे पाऊल उचलले आहे.

26 मार्च रोजी पुण्यात इलेक्ट्रिक दुचाकीला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करत असल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. अशा प्रकारची ही एकमेव घटना असल्याचं प्राथमिक तपासात समोर येत आहे. मात्र, कंपनीने सांगितले की सुरक्षेचा उपाय म्हणून, ती या बॅचमधील 1,441 इलेक्ट्रिक वाहने बाजारातून मागे घेत आहे आणि कंपनी या स्कूटरची तपासणी करेल.

ओला इलेक्ट्रिकने सांगितले की, “या स्कूटर्सची आमच्या अभियंत्यांकडून कसून तपासणी केली जाईल. ते बॅटरी सिस्टीम, थर्मल सिस्टीमपासून ते सिक्युरिटी सिस्टीमपर्यंत सर्व काही तपासतील.” कंपनीने दावा केला आहे की तिची बॅटरी सिस्टीम आधीपासूनच अनुरूप आहे आणि AIS 156 साठी चाचणी केली गेली आहे. भारतासाठी हे प्रस्तावित नवीन स्टँडर्ड आहे. याशिवाय, ही बॅटरी युरोपियन स्टँडर्ड ECE 136 ला देखील पूर्ण करते. या प्रकरणाची तातडीने दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या प्रकरणांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर
अजित पवार म्हणाले, कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी गृहखात्याची

ओकिनावाने परत मागवल्या 3,000 गाड्या

अलीकडच्या काळात देशात अनेक ठिकाणी इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक दुचाकी कंपन्या बाजारातून त्यांची वाहने परत मागवत आहेत. ओकिनावा ऑटोटेकने बाजारातून 3,000 हून अधिक युनिट्स परत मागवले आहेत. Pure EV ने देखील बाजारातून 2,000 युनिट्स काढून घेतले आहेत. गेल्या दोन महिन्यांत इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत, यामुळे ग्राहकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणांमध्ये आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे, याची सरकारी यंत्रणांकडून दखल घेण्यात येत आहे.

ओला इलेक्ट्रिक स्कूटर
".. है क्या हिम्मत?"; नितेश राणेंचं शिवसेनेच्या नेत्यांना आव्हान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com