असं काय आहे या फोटोत जो सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरतोय !

टीम-ई-सकाळ
Friday, 29 November 2019

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही त्यांना शुभेच्या दिल्या. यावेळी त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हेही बाजूला उभे राहून स्मितहास्य करत असल्याचे आपल्याला दिसत आहे.

मुंबई : राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल (ता. २८) मुख्यमंत्री म्हणून शिवाजी पार्कवर शपथ घेतली. त्यानंतर त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या. परंतु, आपल्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हातात हात देऊन घेतलेल्या शुभेच्छांचा फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे.

भाजपसाठी जीडीपी म्हणजे, गोडसे डिवीसिव पॉलिटिक्स

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनीही त्यांना शुभेच्या दिल्या. यावेळी त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे हेही बाजूला उभे राहून स्मितहास्य करत असल्याचे आपल्याला दिसत आहे. नेटीझन्सच्या म्हणण्यानुसार त्यांना हा फोटो प्रचंड आवडला असून हा केवळ एक फोटो नाही तर अवघ्या जीवनाचा प्रवास या एका क्षणात एकवटलेला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

एका पुरुषाने आपल्या खात्रीच्या सोबतीला हातात घेऊन असे मंद स्मित द्यावे आणि त्यांनी लाजून ते स्वीकारावे. अभिनंदन कोण कुणाचे करतंय ते महत्वाचे नाही. पण हे नातं खरं आहे. आपल्या मुलानेही हा हळुवारपणा, ही गोडी मनात साठवली असल्याचे नेटीझन्स म्हणतात. एका स्त्रीला इतक्या आदराने वागवले कि ती सुखातच नाही समाधानातही वावरताना दिसते. ती खुप सुंदर दिसते. हा फोटो नैसर्गिक आहे. हा क्षणही तितक्याच तत्परतेने टिपला असल्याने दिवस गोड झाला असल्याचे नेटीझन्स म्हणत आहेत. यापूर्वी गेल्या पाच वर्षात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयीही नेटीझन्स मोठ्या प्रमाणात चर्चा करताना दिसून आले.

कमांडो 3 : चित्रपटातील स्कर्ट ओढण्याच्या दृश्यामुळे वाद

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या नेहमी त्यांच्या सोबत असतात. सत्तासंघर्षाच्या काळातही त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांच्या जवळील व्यक्ती सांगतात. काल (ता. २८) शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत शिवसेना नेते एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई तर  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जेष्ठ नेते छगन भुजबळ आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनी शपथ घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cm uddhav thackeray and wife rashmi thackeray photo viral on social media