कमांडो 3 : चित्रपटातील स्कर्ट ओढण्याच्या दृश्यामुळे मोठा वाद

वृत्तसेवा
शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2019

विद्युत जामवालचा कमांडो 3 हा चित्रपट आज (ता.२९) रिलीज झाला असून या चित्रपटाटाच्या ट्रेलरमधील एका व्हिडिओवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हिडीओमध्ये एक पहिलवान एका शाळेतील मुलीचा स्कर्ट ओढत असल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. या दृष्यामुळे नेटीझन्स संतप्त झाले असून कमांडो 3 चित्रपटाला ट्रोल करण्यात येत आहे.

पुणे : विद्युत जामवालचा कमांडो 3 हा चित्रपट आज (ता.२९) रिलीज झाला असून या चित्रपटाटाच्या ट्रेलरमधील एका व्हिडिओवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. व्हिडीओमध्ये एक पहिलवान एका शाळेतील मुलीचा स्कर्ट ओढत असल्याचे दृश्य दाखवण्यात आले आहे. या दृष्यामुळे नेटीझन्स संतप्त झाले असून कमांडो 3 चित्रपटाला ट्रोल करण्यात येत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

पहिलवान हे कृत्य करत असताना अभिनेता विद्युतची एण्ट्री होते. तो हे सगळं थांबवतो. पण शाळेतील मुलीवर होणाऱ्या लैंगिक शोषणाचे दृश्य चित्रपटात दाखवल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळत असला तरी काही दिवसांपूर्वी चित्रपटाच्या प्रमोनशसाठी निर्मात्यांनी अभिनेत्याच्या एण्ट्रीचा एक सीन यूट्यूबवर शेअर केला होता. या सीनमुळे सध्या सोशल मीडियावर चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांवर टीका करण्यात येत आहे.

#DevendraFadanvisForPM होतोय ट्रेण्ड; कोणी केला पाहून व्हाल चकित

दरम्यान कमांडो 3 हा चित्रपट कमांडो चित्रपट मालिकेतला तिसरा चित्रपट आहे. या चित्रपटात विद्युत जामवाल व्यतिरिक्त अदा शर्मा आणि गुल्शन देवय्या देखील महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचे दिसत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vidyut Jammwals entry shows wrestler pulling up a schoolgirls skirt Internet is disgusted