मुख्यमंत्री ठाकरेंचा दरड दुर्घटनाग्रस्त भागाचा दौरा

मुख्यमंत्री ठाकरेंचा दरड दुर्घटनाग्रस्त भागाचा  दौरा

रायगडमधील दोन वेगवेगळ्या दरड कोसळण्याच्या घटनांमधील एकूण मृतांचा आकडा 44 वर पोहोचला आहे. या दुर्घटनेमध्ये 40 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता व्यक्त केली आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात पावसाने हाहा:कार माजवला आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडत आहेत. रात्री पाऊस सुरु असतानाच रायगडमधील तळीये गावातील 32 घरांवर दरड कोसळली. यामध्ये आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुर्घटनास्थळाची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज दुपारी 12 वाजता मुंबईहून हेलिकॉप्टरने महाडकडे रवाना होत आहेत. महाड येथील एमआयडीसी हेलिपॅड येथे पोहोचून ते वाहनाने तळीये गावासाठी रवाना होतील. दुपारी १.३० वाजता तळीये येथे पोहचून ते दुर्घटनाग्रस्त गावाची पाहणी करतील. दुपारी ३.२० वाजता ते परत महाड होऊन मुंबईकडे हेलिकॉप्टरने रवाना होतील, अशी माहिती मुख्यमंत्री सचिवालयाकडून मिळाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मुंबईवरुन रवाना होणार आहेत. पण प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, या दुर्घटनेच्या 48 तासानंतरही एनडीआरफ पथके दाखल झालेली नाहीत. मुख्यमंत्री आता या दुर्घटनेची पहाणी करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दर्घटनेतील मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत व जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असं सांगिलं आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, असेही ते म्हणाले.

शुक्रवारी मंत्रालयातील नियंत्रण कक्षात जाऊन घटनेचा आढवा मुख्यमंत्र्यांनी घेतला होता. कोकण किनारपट्टी, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रालयातील नियंत्रण कक्षात आढावा घेतला तसेच बचाव मदत कार्याबाबत प्रशासनास सूचना दिल्या, आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com