esakal | मंदिरं उघडू की आरोग्यकेंद्र? - मुख्यमंत्री
sakal

बोलून बातमी शोधा

CM Uddhav Thackeray

मंदिरं उघडू की आरोग्यकेंद्र? - मुख्यमंत्री

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : मंदिरं बंद असले तरी आरोग्यरुपी मंदिरं सुरू आहेत. त्याबाबत जनता तुम्हाला आशीर्वाद देईल. मंदिरं उघडू की आरोग्यकेंद्र? भारत मातेची मुलं आरोग्याच्या सुविधेअभावी तळमळत असेल तर भारत माता काय म्हणेल. त्यामुळे जनतेचं आरोग्य महत्वाचे आहे. त्यामुळे आरोग्यकेंद्र सुरू राहणे गरजेचे आहे. मंदिरेही उघडणार पण ते टप्प्याटप्प्याने उघडू, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) म्हणाले. कोपर पुलाचा उद्घाटन (kopar bridge inauguration) सोहळ्यात मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थिती दर्शवली. यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा: डोंबिवलीकरांना वाहतूक कोंडीतून मुक्ती देणाऱ्या कोपर पुलाचे पाच फायदे

अंबरनाथ मंदिराबाबतही त्यांनी वक्तव्य केलं. मंदिरं उघडी पाहिजेत. पण मंदिरात जावं वाटलं पाहिजे. सभोवतालचा परिसर स्वच्छ आहे. अंबरनाथचं मंदिर हे महत्वाचं आहे. किती वर्ष झाली हा एक संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या मंदिराच्या सभोवतालचा परिसर स्वच्छ होणे गरजेचे आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच कोरोना काळ संपलेला नाही. आपण जबाबदारीने वागू, असे सर्वपक्षांना सांगितले. राजकारण चालत राहील. मात्र, आपण जबाबदारीने वागले नाहीतर जनता कशी काय जबाबदारीने वागेल? असेही ते म्हणाले.

ठाण्यातील फेरीवाल्यांचा उच्छाद रोखणार -

रिंग रोड, स्कॉयवॉक फेरीवाला मुक्त होणे गरेजेच आहे. त्यासाठी अत्यंत कठोर कारवाई करावी लागेल. आता दया, माया, क्षमा देणार नाही. इतर ठिकाणचाही फेरिवाल्यांचा उच्छाद आटोक्यात आणावा लागेल. माता-भगिनींच्या संरक्षणासाठी ते गरजेचे आहे. आता फेरिवाल्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आज केंद्रीय मंत्री म्हणून कपिल पाटील समोर बसले आहेत. यापूर्वी तंत्रज्ञान कितीही प्रगत असले तरी तुमचा आवाज तिथे पोहोचत नव्हता. पण, आपलं इकडे कनेक्शन एकदम घट्टं होतं. आता अनेक चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत. अनेक कार्यक्रमांचे लोकार्पण आपण करतोय. जनतेला आपल्याकडून अपेक्षा आहेत. आम्हाला देखील काही अपेक्षा तुमच्याकडून आहेत आणि त्या तुम्ही पूर्ण कराल, अशी आशा आहे, असेही मुख्यमंत्री खासदार कपिल पाटलांना म्हणाले.

गडकरींचं केलं कौतुक -

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हृदयसम्राटांचं पुणे-मुंबई रस्त्याचं स्वप्न पूर्ण केले. त्यांनी फक्त राज्यात नाहीतर देशात ख्याती मिळविली. जनतेच्या सोयीसाठी अनेक रस्ते तयार केलेत, अशा शब्दात गडकरींचे कौतुक केले. राज्य सरकार काय आणि केंद्र सरकार काय हे जनतेसाठी असतात. काही गोष्टी केंद्राकडून अपेक्षित आहेत. आम्ही तुमच्याकडे मागणार तुम्ही केंद्राकडे मागा. आपण मिळून जनतेच्या अपेक्षा पूर्ण करूयात, असेही मुख्यमंत्री कपिल पाटलांना म्हणाले.

loading image
go to top