esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीत; पूरपरिस्थितीचा घेणार आढावा
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav thackeray

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगलीत; पूरपरिस्थितीचा घेणार आढावा

sakal_logo
By
विनायक होगाडे

मुंबई : सांगली, कोल्हापूर, कोकण भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूराचं थैमान पहायला मिळालं. अनेक ठिकाणी दरड कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झालेली पहायला मिळाली. तळीये सारख्या रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्त गावामध्ये मोठा हाहाकार झालेला पहायला मिळाला. दुसरीकडे अजूनही पूरातून सांगली, कोल्हापूर जिल्हा सावरलेला दिसून येत नाहीये.

हेही वाचा: दक्षिण मुंबईला कोरोनाचा विळखा, बाधितांच्या लसीकरणाची तपासणी

या पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दौऱ्यावर असणार आहेत. ते उद्या सांगलीतील पूरपरिस्थितीचा आढावा घेणार आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरचा दौरा केला होता. कोल्हापूर दौऱ्यात माजी आणि आजी मुख्यमंत्री एकमेकांसमोर आलेले पहायला मिळाले होते.

जुलै महिन्यात सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी व महापुरामुळे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दिनांक 02 ऑगस्ट 2021 रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

दिनांक 02 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8.40 वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ सांताक्रुझकडे प्रयाण. सकाळी 8.55 वा. छ.शि.म.आं.विमानतळ सांताक्रुझ येथे आगमन. सकाळी 9 वा. विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण. सकाळी 9.50 वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन. सकाळी 9.55 वा. मोटारीने भिलवडी ता-पलूस, जिल्हा - सांगलीकडे प्रयाण. सकाळी 10.55 वा. भिलवडी, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. सकाळी 11.05 वा. मोटारीने अंकलखोप, ता-पलूसकडे प्रयाण. सकाळी 11.10 वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद. सकाळी 11.20 वा. मोटारीने कसबे डिग्रज, जिल्हा – सांगलीकडे प्रयाण, 11.55 वा. कसबे डिग्रज जिल्हा - सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी 12.05 वा. मोटारीने मौजे डिग्रज, जिल्हा –सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12.10 वा. मौजे डिग्रज, जिल्हा – सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी 12.20 वा. मोटारीने आयर्विन पुल, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12.30 वा. आयर्विन पुल, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी 12.40 वा. मोटारीने हरभट रोड, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 12.45 वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी. दुपारी 12.55 वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगलीकडे प्रयाण. दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद. दुपारी 1.45 वा. मोटारीने भारती विद्यापीठ, भारती मेडिकल कॉलेजकडे प्रयाण. दुपारी 1.50 वा. भारती विद्यापीठ, भारती मेडकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव. दुपारी 2.15 वा. मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन, दुपारी 3.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.

loading image
go to top