esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर
sakal

बोलून बातमी शोधा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सांगली दौऱ्यावर

sakal_logo
By
सकाळ वत्तसेवा

CM Uddhav Thackeray Visit : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज, सोमवारी सांगलीच्या दौऱ्यावर असून अतिवृष्टी आणि महापूरामुळं झालेल्या नुकसानाची पाहणी करणार आहेत. याआधी मुख्यमंत्र्यांनी रायगड, चिपळून आणि कोल्हापूरचा दौरा केला होता. कोल्हापूर दौऱ्यात माजी आणि आजी मुख्यमंत्री एकमेकांसमोर आलेले पहायला मिळाले होते.

22 आणि 23 जुलै रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. कृष्णा आणि वारणा या नद्यांना आलेल्या पुरामुळं अनेक गावं पाण्याखाली गेली होती. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळं अजूनही सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी वाढण्याचा धोका आहे. येथील नागरिकांचं जनजिवन विस्कळीत झालं आहे. त्यांना धीर देण्यासाठी आणि पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री सांगली दौऱ्यावर आहेत.

हेही वाचा: ...म्हणून शांत! नाहीतर राणेंचं तोंड दोन मिनिटात बंद करु!

त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे :

दिनांक 02 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 8.40 वा. मातोश्री निवासस्थान येथून मोटारीने छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतळ सांताक्रुझकडे प्रयाण.

सकाळी 8.55 वा. छ.शि.म.आं.विमानतळ सांताक्रुझ येथे आगमन.

सकाळी 9 वा. विमानाने कोल्हापूरकडे प्रयाण.

सकाळी 9.50 वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.

सकाळी 9.55 वा. मोटारीने भिलवडी ता-पलूस, जिल्हा - सांगलीकडे प्रयाण.

सकाळी 10.55 वा. भिलवडी, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.

सकाळी 11.05 वा. मोटारीने अंकलखोप, ता-पलूसकडे प्रयाण.

सकाळी 11.10 वा. अंकलखोप, ता-पलूस येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी व नागरिकांशी संवाद.

सकाळी 11.20 वा. मोटारीने कसबे डिग्रज, जिल्हा – सांगलीकडे प्रयाण,

11.55 वा. कसबे डिग्रज जिल्हा - सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

दुपारी 12.05 वा. मोटारीने मौजे डिग्रज, जिल्हा –सांगलीकडे प्रयाण.

दुपारी 12.10 वा. मौजे डिग्रज, जिल्हा – सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

दुपारी 12.20 वा. मोटारीने आयर्विन पुल, सांगलीकडे प्रयाण.

दुपारी 12.30 वा. आयर्विन पुल, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

दुपारी 12.40 वा. मोटारीने हरभट रोड, सांगलीकडे प्रयाण.

दुपारी 12.45 वा. हरभट रोड, सांगली येथे आगमन व पुरामुळे बाधीत भागाची पाहणी.

दुपारी 12.55 वा. मोटारीने जिल्हाधिकारी कार्यालय, सांगलीकडे प्रयाण.

दुपारी 1 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे आगमन व सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थितीबाबत आढावा बैठक व पत्रकार परिषद.

दुपारी 1.45 वा. मोटारीने भारती विद्यापीठ, भारती मेडिकल कॉलेजकडे प्रयाण.

दुपारी 1.50 वा. भारती विद्यापीठ, भारती मेडकल कॉलेज कॅम्पस येथे आगमन व राखीव.

दुपारी 2.15 वा. मोटारीने कोल्हापूरकडे प्रयाण.

दुपारी 3.30 वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन,

दुपारी 3.35 वा. विमानाने मुंबईकडे प्रयाण.

loading image
go to top