

Cockroach Janta Party Sparks Digital Youth Revolt Against System and Politics
esakal
देशभरात आणि सोशल मीडियावर सध्या एका अनोख्या राजकीय पक्षाची चर्चा रंगली आहे. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ या नावाने सुरू झालेल्या या चळवळीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी साम टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या भूमिकेचा खुलासा केला. सरन्यायाधीशांच्या वक्तव्याविरोधात निर्माण झालेल्या संतापातून सुरू झालेली ही मोहीम आता लाखो युवकांना जोडत असल्याचा दावा करण्यात येत आहे.