महाराष्ट्रात 19 सप्टेंबरनंतर आचारसंहिता लागणार..! 

संजय मिस्कीन 
बुधवार, 11 सप्टेंबर 2019

पुरग्रस्त भागातील उपाययोजनांसाठी प्रशासन व्यस्त असल्याने या भागातील कर्जाची व शेतकऱ्यांची आकडेवारी सरकारला मिळालेला नव्हती. आता ती मिळवण्याची तयारी सुरू झाली आहे. 

मुंबई : आचारसंहितेच्या काळजीनं महाराष्ट्रात लगबग सुरू असली तरी 19 सप्टेंबर नंतर कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागणार आहे. निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग महाराष्ट्रात 15 ते 16 सप्टेंबर दरम्यान येणार असून त्यानंतर तीन ते चार दिवसांनी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. तर 17 सप्टेंबर ला राज्यमंत्री मंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीत सरसकट कर्जमाफीचा निर्णय होण्याचे संकेत असून त्यासाठी मंत्रालय स्तरावर जोरदार हालचाली सुरू आहेत. 

पुरग्रस्त भागातील उपाययोजनांसाठी प्रशासन व्यस्त असल्याने या भागातील कर्जाची व शेतकऱ्यांची आकडेवारी सरकारला मिळालेला नव्हती. आता ती मिळवण्याची तयारी सुरू झाली आहे. 

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 सप्टेंबर ला महाराष्ट्र दौर्यावर येत आहेत. या दौर्यात सरसकट कर्जमाफी व पुरग्रस्तांसाठीचे केंद्रीय पॅकेजची घोषणा ते करतील असे सांगण्यात येते. 

या सर्व पार्श्वभूमीवर विधानसभेची आचारसंहिता 19 सप्टेंबर नंतरच लागणार हे स्पष्ट आहे. खात्रीलायक सुत्रांनुसार आचारसंहिताल 20 सप्टेंबरला लागेल असे सांगण्यात येते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: code of conduct starts in Maharashtra on 19 September