Loksabha 2019 : आचारसंहिताभंगाची शिवसेनेविरोधात तक्रार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 एप्रिल 2019

शिवसेनेचे वसई शहरप्रमुख प्रथमेश राऊत यांच्याविरोधात वालीव पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 5) आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

विरार : लोकसभा निवडणुकीच्या मुद्द्यावरून वातावरण तापू लागलेले असतानाच शिवसेनेचे वसई शहरप्रमुख प्रथमेश राऊत यांच्याविरोधात वालीव पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. 5) आचारसंहिताभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

शिवसेना पक्षप्रमुखांच्या संवाद दौरा कार्यक्रमाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बाफाने फाटा येथील उड्डाण पुलावर पक्षातर्फे बॅनरबाजी करण्यात आल्याने अनधिकृत बॅनर लावल्याप्रकरणी तक्रार करण्यात आली होती. याविरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्य एका प्रकरणात वसई पश्‍चिम येथील पंचवटी नाका ते अंबाडी रोड; तसेच अंबाडी रोड ते बाभोळा नाकाच्यादरम्यान बॅनर व वसई-विरार महापालिकेच्या हद्दीत इलेक्‍ट्रिक पोलवर शिवसेना, भाजप व आरपीआय पक्षाचे झेंडे अधिकृत परवानगीशिवाय लावल्याने कल्पेश पांडे, भाजप व आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते यांच्याविरुद्ध आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: Code of Conduct Violence Complaints against Shivsena