राज्यात हुडहुडी वाढली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

पुणे - उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यात गारठा चांगलाच वाढला आहे. तापमान १० अंशांच्या खाली घसरल्याने नाशिक, औरंगाबादमध्येही हुडहुडी वाढली आहे. नगर येथे पारा आणखी घसरून बुधवारी (ता. १२) हंगामातील नीचांकी ८.२ अंशांवर आला आहे. राज्यात मुख्यत: कोरड्या हवामानाचा अंदाज असून, गारठा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

पावसाला पोषक हवामान निवळल्यानंतर राज्यात आकाश निरभ्र झाले आहे. किमान तापमानात घट होऊन, गारठा पुन्हा वाढला आहे. राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास असून, काही ठिकाणी १ ते ५ अंशांची घट झाली आहे. पुणे, जळगाव, सातारा, नागपूर येथे किमान तापमान ११ अशांच्या खाली आल्याने तेथेही थंडी वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे ८.८ अंश सेल्सिअसची नोंद झाली तर महाबळेश्‍वरच्या वेण्णा लेक परिसरात तापमानात मोठी घट झाल्याने दवबिंदू गोठल्याचे पाहायला मिळाले.

थंडीचा प्रभाव
    नगर, औरंगाबाद, नाशिक प्रभावित
    नगरला नीचांकी ८.२ अंश तापमान
    निफाड येथे पारा ८.८ अंशांवर
    महाबळेश्‍वरला दवबिंदू गोठले

Web Title: Cold Increase in Maharashtra