उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 डिसेंबर 2018

पुणे - ‘पेथाई’ चक्रीवादळ ओसरल्यानंतर उत्तरेकडील थंड वारे महाराष्ट्राकडे आल्याने राज्याला हुडहुडी भरली आहे. बुधवारी (ता. १९) धुळे येथे नीचांकी ५ अंश सेल्सिअसची नोंद होत थंडीची लाट आली, तर नगर येथे ७.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

राज्यात अनेक ठिकाणी धुक्यांची चादर पसरली असून, तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. शनिवारपर्यंत (ता. २२) उत्तर महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. 

उत्तर भारतातील राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाना राज्यांमध्ये थंडीची लाट आली असून, दाट धुके पडत आहे. या राज्यांमध्ये दिवसाच्या तापमानात मोठी घट झाली आहे. बुधवारी (ता. १९) राजस्थानच्या सिकार येथे देशाच्या सपाट भूभागावरील नीचांकी ०.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर महाराष्ट्रातही तापमानाचा पारा सरासरीपेक्षा १ ते ४ अंशांच्या खाली उतरल्याने गारठा वाढला आहे.

Web Title: Cold North Maharashtra Temperature Decrease