राज्यात थंडीचा कडाका कायम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 जानेवारी 2019

पुणे -  राज्यातील थंडीचा पारा घसरलेलाच आहे. मराठवाडा व पश्चिम विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घसरण झाली आहे. त्यामुळे या भागांतही थंडी वाढली असून नगर, नाशिक, जळगाव, नागपूर या जिल्ह्यांच्या परिसरातही थंडीचा पारा जवळपास जैसे थे आहे. 

पुणे -  राज्यातील थंडीचा पारा घसरलेलाच आहे. मराठवाडा व पश्चिम विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांच्या किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घसरण झाली आहे. त्यामुळे या भागांतही थंडी वाढली असून नगर, नाशिक, जळगाव, नागपूर या जिल्ह्यांच्या परिसरातही थंडीचा पारा जवळपास जैसे थे आहे. 

उत्तरेकडून येत असलेले थंडीच्या लाटेमुळे राज्यातील किमान तापमानात घट झाली आहे. नाशिकमधील निफाड येथील गहू संशोधन केंद्रातील किमान तापमान एक ते दीड अंश सेल्सिअसची वाढ झाली असून राज्यातील सर्वात कमी ३.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात येत्या दोन ते तीन दिवस ही थंडी काही प्रमाणात राहणार आहे. त्यानंतर हळूहळू किमान तापमानाचा पारा वाढून थंडी कमी होण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे. थंडीच्या लाटेमुळे मध्य महाराष्ट्रातील किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत आठ अंशापर्यंत खाली आला आहे. विदर्भातील नागपूर येथील पारा 

सरासरीच्या तुलनेत सर्वाधिक आठ अंशापर्यंत खाली येऊन ५.४ अंश सेल्सिअस एवढ्या किमान तापमानाची नोंद झाली. नगरमध्ये सरासरीच्या तुलनेत सात अंश घट झाली आहे. निफाड पाठोपाठ नगरमध्ये ४.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. चंद्रपूर, सोलापूर, गोंदिया, परभणी येथील किमान तापमानातही सरासरीच्या तुलनेत सहा अंशापर्यंत घट होऊन किमान तापमानाचा पारा सहा अंशापर्यंत खाली आला आहे. कोकणातही थंडी किंचित वाढली असून पारा एक ते दोन अंशाने घसरला आहे. 

राज्यात कोरडे हवामान असल्याने आज आणि उद्या विदर्भात तुरळक ठिकाणी लाट येण्याची शक्यता आहे. 

सोमवारी (ता. ३१) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः  मुंबई (सांताक्रुझ) १४.८ (-४), अलिबाग १५.९ (-१), रत्नागिरी १७.० (-२), डहाणू १४.० (-३), पुणे ७.६ (-३), जळगाव ६.२ (-५), नगर ४.६ (-७),  कोल्हापूर १३.५ (-१), महाबळेश्वर १२.४ (-१), मालेगाव ७.४ (-३), नाशिक ६.२ (-३), सांगली ९.३ (-४), सातारा ९.४ (-३), सोलापूर ९.७ (-६), औरंगाबाद ८.४ (-२),  परभणी ७.५ (-६), उस्मानाबाद १०.९, नांदेड १२.५, अकोला ७.२ (-५), अमरावती ९.६ (-५), बुलढाणा १०.८(-४), चंद्रपूर ६.८ (-६), गोंदिया ६.७ (-६), नागपूर ५.४ (-८), वर्धा १०.० (-५), यवतमाळ ९.४ (-५)

Web Title: cold wave continues in the state