cold pune
Sakal
राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. नाशिकमध्ये निफाड तालुक्यात हंगामातील निचांकी तापमानाची नोंद झाली. गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे तापमानाचा पारा ५.६ अंश सेल्सियसपर्यंत खाली आला होता. तर नाशिकमत्ये ७.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. कडाक्याची थंडी रब्बी पिकांसाठी पोषक असली तरी यामुळे द्राक्ष बागा धोक्यात येण्याची शक्यता आहे. भुरी रोगासह, तुडतुडे, मावा रोग यांच्या प्रादुर्भावाची भीती व्यक्त केली जात आहे.