पदव्युत्तर जागा भरणार की नाही?

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

मुंबई - राज्यातील 11 खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी पदव्युत्तर जागा भरणार की नाही, याबाबत 20 एप्रिलपर्यंत स्पष्ट करावे, असे पत्र वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने पाठवले आहे. व्यवस्थापन कोट्यातील जागा फी निर्धारण समितीने निश्‍चित केलेल्या एनआरआय जागांच्या शुल्कानुसार भरण्याचा निर्णय खासगी महाविद्यालयांनी परस्पर घेतला आहे. त्यावर ही विचारणा करण्यात आली आहे.

महाविद्यालयांच्या या निर्णयाने विद्यार्थ्यांवर त्याचा विपरित परिणाम होऊन राज्यातील 400 पैकी 192 जागा रिकाम्या राहण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. रुग्णालये चालवण्यासाठी येणाऱ्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी संस्थाचालकांनी 50 टक्‍के प्रवेशांसाठी जास्त शुल्क वसूल करण्याची भूमिका घेतली आहे. यातून निर्माण झालेली प्रवेश कोंडी फोडण्यासाठी वैद्यकीय शिक्षण संचनालय आणि महाराष्ट्र सरकारने एकत्रित संबंधित व्यवस्थापनांना कारणे दाखवा नोटीस पाठवल्या आहेत. यावर व्यवस्थापनाकडून काय भूमिका घेतली जाते, हे उद्या (ता. 20) समजेल.

Web Title: college seats state government private medical college